Shivsanwad Yatra: आपल्याला राजकारण जमलं नाही- आदित्य ठाकरे

| Updated on: Jul 21, 2022 | 2:14 PM

आज आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेत शिवसैनिकांशी संवाद साधला. ज्यांना सत्तेचा लाभ मिळाला ते शिंदे गटात सामील झाले आणि ज्यांच्यावर अन्याय झाला ते प्रामाणिक शिवसैनिक अजूनही शिवसेनेत आहेत असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर कुठल्याही जातीचा, भाषेचा भेद न करता सर्वांसाठी काम केले असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्टाची […]

आज आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेत शिवसैनिकांशी संवाद साधला. ज्यांना सत्तेचा लाभ मिळाला ते शिंदे गटात सामील झाले आणि ज्यांच्यावर अन्याय झाला ते प्रामाणिक शिवसैनिक अजूनही शिवसेनेत आहेत असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर कुठल्याही जातीचा, भाषेचा भेद न करता सर्वांसाठी काम केले असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्टाची सेवा करीत असताना राजकारण कमी केले हे आपले चुकले, आपल्याला राजकारण जमलं नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. राजकारण न जमल्यामुळे आज आपल्यावर ही वेळ आल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रात काही काळापासून क्लेशदायक वातावरण आहे, सध्या सुरु असललेली सर्कस राजकारण म्हणून न पटणारी असल्याचेही आदित्य ठाकरे सभेत म्हणाले.

 

Published on: Jul 21, 2022 01:50 PM