‘ते डरपोक आणि पळपुटे नेत्यांपैकी नाहीत’; राऊत यांचा जयंत पाटील यांच्या त्या चर्चेवर प्रतिक्रिया

‘ते डरपोक आणि पळपुटे नेत्यांपैकी नाहीत’; राऊत यांचा जयंत पाटील यांच्या त्या चर्चेवर प्रतिक्रिया

| Updated on: Aug 07, 2023 | 11:13 AM

तर ते आणि त्यांच्या बरोबर आणखी काही नेते हे वलकरच सत्तेत जातील अशा वावड्या सध्या उठत आहेत. त्यावरून जयंत पाटील यांनी कालच याबाबत स्पष्टीकरण दिलं असून आपण शरद पवार यांच्याबरोबरच राहणार असल्याचे म्हटलं होतं

मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात भेट झाली. तर ते आणि त्यांच्या बरोबर आणखी काही नेते हे लवकरच सत्तेत जातील अशा वावड्या सध्या उठत आहेत. त्यावरून जयंत पाटील यांनी कालच याबाबत स्पष्टीकरण दिलं असून आपण शरद पवार यांच्याबरोबरच राहणार असल्याचे म्हटलं होतं. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी, जयंत पाटील आणि आमचे डीएनए एकसारखे असून आम्ही पळपूट आणि डरपोक नाही असे म्हटलं आहे. राऊत यांनी ही प्रतिक्रिया आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी, आपला नेता, पक्ष हा संकटात असताना, डरपोक आणि पळपूट्यासारखे ते पळून जाणाऱ्यातील नाहीत असे म्हटलं आहे. तर त्यांनी आधीच स्पष्ट सांगितलं आहे की शाह यांना ते भेटलेले नाहीत.

Published on: Aug 07, 2023 11:13 AM