ना अजितदादा, ना सुप्रियाताई, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात तिसराच मुख्यमंत्री!

ना अजितदादा, ना सुप्रियाताई, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात तिसराच मुख्यमंत्री!

| Updated on: Feb 15, 2023 | 3:51 PM

राष्ट्रवादी आणि राज्याचं मुख्यमंत्रिपद यांची जोरदार चर्चा होतेय. राष्ट्रवादी बहुमतात आल्यास मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होतेय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात कोण आहे? पाहा...

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि राज्याचं मुख्यमंत्रिपद यांची जोरदार चर्चा होतेय. राष्ट्रवादी बहुमतात आल्यास मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होतेय. कुणी सुप्रिया सुळे तर कुणी अजित पवार यांचं नाव पुढे करतंय. अशात मुंबईत लागलेल्या पोस्टरमुळे आणखी एका नावाची चर्चा होतेय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोस्टर लावलेत. यावर “बॉस, माझं दैवत भावी मुख्यमंत्री, वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे चर्चा जरी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाची होत असली तरी मुंबईत पोस्टर मात्र जयंत पाटलांचे लागलेत. त्यामुळे आता चर्चां तर होणारच!

Published on: Feb 15, 2023 03:51 PM