शरद पवारांच्या राजीनाम्यानं महाविकास आघाडीत बिघाड? काय होतील परिणाम? जयंत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होण्याचे काही कारण नाही. कारण आम्ही पक्ष म्हणून महाविकास आघाडीत आहोत.
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शरद पवारांच्या राजीनाम्याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार असा प्रश्नही विचारला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होण्याचे काही कारण नाही. कारण आम्ही पक्ष म्हणून महाविकास आघाडीत आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीत फरक पडण्याची आवश्यकता नाही. महाविकास आघाडी किंवा पक्षाच्या संदर्भात पवार यांनीच त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी मी पक्षाबरोबर आहे. पक्षात काम करतोय. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणता तडा जाईल असं मला वाटत नाही. पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सक्षम पणाने महाराष्ट्रात काम करेल.