आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांची ‘गुप्त’भेट?, राजकीय वर्तुळात चर्चा; जयंत पाटील यांचे मिश्किल वक्तव्य
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान राज्याच्या राजकारणात चर्चांना उधान आनणारी दुसरी भेट घडून आली आहे. ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तर राजकीय वर्तुळात या भेटीची खमंग चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक : 20 ऑगस्ट 2023 | शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांची आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची भेट झाल्याचे तर गुप्त बैठक झाल्याचे बोलले जात आहे. यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. तर विविध चर्चांना उधान आलं आहे. आदित्य ठाकरे व मंत्री दादा भुसे यांची नाशिकच्या एका रिसॉर्टमध्ये भेट झाल्याचा दावा केला जातोय. मात्र हे वृत्त भुसे यांनी फेटाळले असले तरी यावरून आता प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावरून बोलताना, याबाबत माहिती घेऊन बोलतो. पण अशा झालेल्या बैठकीतून हेच स्पष्ट होतयं की शेवटी माणसं आपल्याच घी जाण्याचा प्रयत्न करतात.
Published on: Aug 20, 2023 08:11 AM
Latest Videos