सहकार क्षेत्र अन् खासगी व्यावसायातील स्पर्धेवर बोलताना जयंत पाटलांनी गुलाबराव पाटलांच्या आठवणी जागवल्या…
दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दीचा सांगता सोहळा आज पार पडला. या सोहळ्यात जयंत पाटील यांनी सहकार क्षेत्रावर भाष्य केलं. पाहा ते काय म्हणालेत...
सांगली : दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दीचा सांगता सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला शरद पवार, एच. के. पाटील उपस्थित होते. याशिवाय माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात,विश्वजीत कदम, सुरेश खाडे, विक्रम सावंत यासह अन्य लोक उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी सहकार क्षेत्र अन् खासगी व्यावसायातील स्पर्धेवर केलं. “सहकार चळवळ वाढली पाहिजे. प्रामाणिक काम करणारे लोकं आज या क्षेत्रात राहणं गरजेचं आहे. खासगी व्यवसाय स्पर्धा वाढली आहे. लोक सहकारी व्यवस्थेवर अवलंबून न राहता खासगी क्षेत्राला जवळ करतात. खासगी कंपन्या काढत आहेत. पण या सगळ्यात सहकार क्षेत्र टिकलं पाहिजे”, असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटलांच्या आठवणी जागवल्या…