…तर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंच नसतं; जयंत पाटील यांची सरकारवर टीका
जयंत पाटील यांनी शेतकरी आंदोलन आणि बालविवाहांचं वाढतं प्रमाण यावर भाष्य केलं आहे. "राज्यात बालविवाहांचं प्रमाण वाढलं आहे. बालविवाह करणं आणि आखाती देशात त्यांची विक्री करणं याचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत ही सभागृहात मुद्दा उपस्थित केला सरकारने याबाबत गंभीर पावलं उचलावीत, असं जयंत पाटील म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मोर्चावरून सरकारवर टीका केली आहे. “नुकतंच राज्य सराकरने बजेट सादर केलं. यात शेतकऱ्यांसाठी काहीही विशेष सवलती, योजनांची घोषणा करण्यात आली नाही. या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर आंदोलन झालं नसतं. बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले गेली आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनात इतर शक्ती आहे, तर सरकारकडे गृह खातं आहे. त्यांनी ते शोधून काढावं”, असं जयंत पाटील म्हणालेत. राज्यातील सिचन प्रकल्पांना पाहिजे त्या प्रमाणत निधी दिला गेला नाही. याबाबत आम्ही आज सभागृहातही आवाज उठवला, असंही जयंत पाटील यांनी म्हणालेत.
Published on: Mar 16, 2023 07:25 AM
Latest Videos