उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी जयंत पाटील यांचं महत्वाचं वक्तव्य; ठाकरेंच्या सभेचं वैशिष्ट्य सांगितलं…
Jayant Patil on Uddhav Thackeray Malegoan Sabha : मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला पाठिंबा नक्की दिसेल, असं जयंत पाटील म्हणालेत. शिवाय उद्धव ठाकरे यांच्या सभेचं वैशिष्ट्यही त्यांनी सांगितलं आहे. पाहा...
नंदुरबार : उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये सभा होतेय. या सभेबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे मालेगावमध्ये सभा घेत आहे. या सभेतून नाशिकच्या लोकांचा त्यांना असणारा पाठींबा नक्कीच व्यक्त होईल. लोक ओढून आणावा लागत नाही ते स्वत: हून येतात, हे उद्धव ठाकरे यांच्या सभेचं वैशिष्ट असतं”, असं जयंत पाटील म्हणालेत. लोकांचा आजही उद्धव ठाकरेंवरच विश्वास आहे. लोकांचं प्रेम आणि आशिर्वाद उद्धव ठाकरेंच्याच बाजूने असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय. आजही त्याचीच प्रचिती येईल, असं जयंत पाटील म्हणालेत.
Published on: Mar 26, 2023 01:27 PM
Latest Videos