Jayant Patil : ईडी चौकशी साडेनऊ तासानंतर संपली, बाहेर येताच केलं मिश्किल वक्तव्य; म्हणाले…
इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी (IL&FS) संबंधित गैरव्यवहारप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. जयंत पाटील इडी कार्यालयाबाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी एकच घोषणाबाजी केली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल (सोमवारी) मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी पार पडली. ही चौकशी तब्बल साडेनऊ तास झाली. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी (IL&FS) संबंधित गैरव्यवहारप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. जयंत पाटील इडी कार्यालयाबाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी एकच घोषणाबाजी केली. यानेतर जयंत पाटील म्हणाले, तुम्ही सर्व कार्यकर्ते सकाळपासून इडी कार्यालयाबाहेर होता. इडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांचे पूर्ण समाधान मी केले आता त्यांच्याकडे काहीही प्रश्न असतील असे मला वाटत नाही. तुम्ही थांबलात तुमचे आभार. मी माझे कर्तव्य पूर्ण पार पाडले. आता त्यांच्याकडे काहीही प्रश्न शिल्लक असेल असे मला वाटत नाही.
Latest Videos