ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी

“ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी

| Updated on: Jun 01, 2023 | 2:32 PM

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी स्पष्ट भूमिका प्रितम मुंडे यांनी मांडली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी स्पष्ट भूमिका प्रितम मुंडे यांनी मांडली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जगात ज्या महिलांनी नाव कमावलं, पदक मिळवलं, त्यांना खाली रस्त्यावर पाडणं, पोलिसांनी तोंडावर पाय ठेवणे, याचा देशातील खेळाडू आणि खेळावर प्रेम करणारी जनता निषेध करते. एका बाजूला संसदेचं उदघाटन करता आणि दुसऱ्या बाजूला कुस्तीपटूंचं आंदोलन चिरडता. भाजपने स्वतःहून या कार्यक्रमला गालबोट लावून घेतलं, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच “ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, एवढा पोटतिडकीने मुलींच्या तक्रारी आलेल्या आहेत, त्या गांभीर्याने घेतलं पाहिजे. पण सरकार त्याकडे पाहत नाही. कुणीही आंदोलन केलं तर त्या विरोधात मनात राग धरणारे,लोकशाही न मानणारे सरकार राज्यात आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

Published on: Jun 01, 2023 02:32 PM