चौकशीनंतर त्यांचा फोन मला आला नाही,  जयंत पाटील अजित पवार यांच्यावर नाराज?

“चौकशीनंतर त्यांचा फोन मला आला नाही”, जयंत पाटील अजित पवार यांच्यावर नाराज?

| Updated on: Aug 02, 2023 | 2:57 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात नाराजी असल्याच्या अनेक चर्चा माध्यमांमध्ये येत असतात. मात्र या दोघांकडून अशा चर्चा फेटाळण्यात येतात.मात्र आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या निमित्ताने चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात नाराजी असल्याच्या अनेक चर्चा माध्यमांमध्ये येत असतात. मात्र या दोघांकडून अशा चर्चा फेटाळण्यात येतात. मात्र आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या निमित्ताने चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी तब्बल 9 तास जयंत पाटील यांची ईडी चौकशी झाली. चौकशीनंतर आज जयंत पाटील शरद पवारांची भेट घेण्याकरिता गेले. यावेळी त्यांनी ईडी चौकशीनंतर पक्षातील सर्व नेत्यांचा मला फोन आला, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: May 23, 2023 01:07 PM