Jayant patil | दिल्लीविरोधात बोलता येत नाही म्हणून वेदांताचे खापर राज्य सरकार आमच्यावर फोडत आहे, जयंत पाटील यांची टीका
Jayant patil | दिल्लीविरोधात बोलता येत नाही, त्यामुळे राज्य सरकार वेदांत प्रकल्पाचे खापर आमच्यावर फोडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.
Jayant patil | दिल्लीविरोधात बोलता येत नाही, त्यामुळे राज्य सरकार वेदांत प्रकल्पाचे खापर आमच्यावर फोडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. वेदांता प्रकल्प (Vedanta Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला. हा प्रकल्प अचानक गुजरातला गेल्यावर राज्यात एकच गजहब माजला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर या प्रकल्पाविषयी तोंडसूख घेतले आहे. सत्ताधाऱ्यांनी ही या प्रकल्पावरुन विरोधकांना घेरले आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारच्या काळातच या प्रकल्पासाठी योग्य सोयी-सुविधा देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला.
तर जयंत पाटील यांनी हा आरोप धादांत खोटा असल्याचे म्हटले आहे. सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधीची पहिली उच्चस्तरीय समितीची बैठक घेण्याचे ठरवले होते. पण पुढे हा प्रकल्प थेट गुजरातला गेला. याप्रकरणी दिल्लीला विरोध करता येत नाही, म्हणून राज्य सरकार वेदांत प्रकल्पाचे खापर मागील सरकारवर फोडत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.