Video : जयश्री पाटील यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

Video : जयश्री पाटील यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

| Updated on: Apr 30, 2022 | 6:26 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाच्या कटात सहभाग असल्याचा आणि आंदोलकांना चिथावणी दिल्याचा आरोप अ‍ॅड. जयश्री पाटील यांचे पती अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झाला. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. तर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayashree Patil) यांचा जामीन अर्ज आज मंजूर […]

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाच्या कटात सहभाग असल्याचा आणि आंदोलकांना चिथावणी दिल्याचा आरोप अ‍ॅड. जयश्री पाटील यांचे पती अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झाला. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. तर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayashree Patil) यांचा जामीन अर्ज आज मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. यावेळी जयश्री पाटील यांनी सत्यमेव जयते असं म्हटलं आहे.  तर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई, कोल्हापूर, सातारा, पुणेसह आणखी 3 जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते.