जेजुरी विश्वस्त निवडीचा वाद चिघळला! ग्रामस्थ आंदोलनकर्ते हायकोर्टात जाणार
जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाचा 11 व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांनी आता यावरून पुण्यात धर्मदाय आयुक्तांची भेट घेतली. त्यांच्याकडून विश्वस्त पदाच्या निवडीच्या विरोधात धर्मदाय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
पुणे : जेजुरी खंडोबा मंदिराच्या विश्वस्त निवडीचा वाद चिघळला आहे. हा वाद आता हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे. येथे नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळात जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांनी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती सहधर्मदाय आयुक्तांनी केलेली आहे. त्याविरोधात जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाचा 11 व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांनी आता यावरून पुण्यात धर्मदाय आयुक्तांची भेट घेतली. त्यांच्याकडून विश्वस्त पदाच्या निवडीच्या विरोधात धर्मदाय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर ग्रामस्थ आंदोलकांकडून विश्वस्त पदांच्या निवडी विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. त्यांच्याकडून धर्मदाय आयुक्त कार्यालयात रिहिव्हिव पिटीशन दाखल करण्यात आली असून विश्वस्तांच्या निवडीला स्थगिती मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य

'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया

करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
