Jejuri News : ‘.. तर गावबंदी करू’, मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
Protest Against Malhar Certificate : मंत्री नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेटबद्दल घेतलेल्या निर्णयाला आज जेजूरीच्या ग्रामस्थांनी कडकडीत विरोध दर्शवला आहे. हे नाव बदलण्यात याव अशी मागणी करण्यात आली आहे.
मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थानी विरोध केला आहे. मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयाला आता जेजूरी मधल्या ग्रामस्थांनी विरोध केला आहे. मल्हार सर्टिफिकेटचं नाव तत्काळ बदलावं अशी मागणी आज ग्रामस्थानी केली आहे. तसंच नितेश राणे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांनी देखील आपली भूमिका बदलावी अन्यथा गाव बंदी करू, असा इशारा देखील ग्रामस्थांनी आज दिला आहे.
दरम्यान, ग्रामस्थांना विश्वासात न घेता जेजूरी मंदिर संस्थानच्या पाच विश्वस्तांनी मुंबईत जाऊन मंत्री नितेश राणे यांना खंडोबा पगडी घालत त्यांचा सन्मान केला होता. त्यानंतर हा गाव बंदीचा इशारा आज देण्यात आला आहे.
Published on: Mar 23, 2025 05:49 PM
Latest Videos

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राऊतांनी घेतली भाजपची बाजू

कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...

राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
