भाजप प्रवेशाची चर्चा? आव्हाड म्हणतात ‘…शी… शी… शी… मला गंमत वाटते…’
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचा गट हा अजित पवार यांच्या गटात लवकरच प्रवेश करेल अशी चर्चा रंगली आहे. तर कळवा - मुंब्र्याचे आमदार आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक जितेंद्र आव्हाड हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते.
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचा गट हा अजित पवार यांच्या गटात लवकरच प्रवेश करेल अशी चर्चा रंगली आहे. तर कळवा – मुंब्र्याचे आमदार आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक जितेंद्र आव्हाड हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. त्यावर आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी, असा संभ्रम आम्ही तर नक्कीच पसरवणार नाही. मग या गोष्टी दुसरं कोण परसरवत आहे असा सवाल केला आहे. तर भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेवर त्यांनी आपली कशी प्रतिक्रिया दिली आहे. ते पाहा…
Published on: Aug 07, 2023 09:16 AM
Latest Videos