‘ज्याला तलवार चालवता येते तो युद्ध करता येतं’, आव्हाड यांचा कोणाला इशारा
शरद पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांची आज बीडमध्ये सभा होणार असून त्याच्या आधी त्यांनी थेट पत्रकारांनाच खेळताका कुस्ती असं म्हणत वयाचा मुद्दा खोडून काढला होता.
औरंगाबाद : 17 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. त्यांनी आता मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरूवात केली असून त्यांची मंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बीडमध्ये सभा होणार आहे. त्याच्याआधी त्यांनी काल पत्रकार परिषदेत वयाचा विषय येतो कुठे मी अजूनही कुस्तीला तयार आहे. खेळता का कुस्ती असं म्हटलं होतं. तर त्यांचे हे वक्तव्य म्हणजे थेट अजित पवार गटालाच आव्हान असल्याचे बोलले जात होते. त्यावरून बीडसह राज्यभर चर्चां रंगल्या होत्या. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी ८३ वर्षांचा माणूस युद्धासाठी निघालेला आहे. तर युद्ध करणाऱ्याला वय नसतं. ज्याला तलवार चालवता येतं तो युद्ध करतो, असे ते म्हणालेत. अजून काय म्हटलं आहे आव्हाड यांनी याबाबत पाहा या व्हिडीओत…