2024 ला राज्यातीलच काय तर केंद्रातील भाजप सरकारही येणारच नाही; कोणी केला गौप्यस्फोट? काय केली टीका?

2024 ला राज्यातीलच काय तर केंद्रातील भाजप सरकारही येणारच नाही; कोणी केला गौप्यस्फोट? काय केली टीका?

| Updated on: Jun 09, 2023 | 6:08 PM

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. तसेच सत्तेतून बाहेर गेल्यावर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच अधिक दंगली झाल्या. तसेच कोल्हापूरमध्ये झालेल्या दंगली आणि मुंब्र्यात झालेल्या धर्मपरिवर्तणावरून सतेज पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची आधी चौकशी करायला हवी असे म्हटलं होतं.

मुंबई : कोल्हापूरमध्ये दंगल झाली. त्याचे तिव्र पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहे. कोल्हापूरनंतर इतर जिल्ह्यात दंगे होताना दिसत आहे. यावरून भाजप नेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. तसेच सत्तेतून बाहेर गेल्यावर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच अधिक दंगली झाल्या. तसेच कोल्हापूरमध्ये झालेल्या दंगली आणि मुंब्र्यात झालेल्या धर्मपरिवर्तणावरून सतेज पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची आधी चौकशी करायला हवी असे म्हटलं होतं. त्यावरून आव्हाड यांनी पलटवार करताना, राज्यात फक्त 1993 साली मोठी दंगल झाली त्यानंतर तशी दंगल झाली नाही. तर भाजपच्या काळात अनेक वेळा दंगली झाल्या. त्याचबरोबर दंगलीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याचंच स्टेटमेंट पहा ते काय म्हणतात. तर तर राज्यातील दलित हा अस्वस्थ आहे. एकिकडे दलितांना मारायचं, मुस्लिमांना मारायचं, ख्रिश्चनांना धमकवायचं, खोट्या बातम्या पेरायच्या, विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे अरे काही तरी महाराष्ट्र ठेवा असं त्यांनी म्हटलं आहे. तर असे करूनही हे सरकार पुढील तीन महिन्यात जाणार ते परत येणार नाही असही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 09, 2023 05:40 PM