मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर क्लस्टर योजनेवरून राष्ट्रवादी नेत्याचे गंभीर आरोप; म्हणाला, 'हव्यासापोटी'

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर क्लस्टर योजनेवरून राष्ट्रवादी नेत्याचे गंभीर आरोप; म्हणाला, ‘हव्यासापोटी’

| Updated on: Jun 07, 2023 | 9:19 AM

या योजनेवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन किसननगर येथे पार पडले. या क्लस्टर योजनेचे कार्यालय कशीश पार्क येथे सुरू करण्यात आले आहे. मात्र या योजनेवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधताना, क्लस्टरमधून अब्जावधी रुपये मिळतील आणि पुढच्या 10 पिढ्या बसून खातील या हव्यासापोटी अशी क्लस्टर योजना राबवत असल्याचा आरोप केला आहे. तर फक्त पैशांसाठीच ही योजना असून ती पुढील 50 वर्षातही पूर्ण होऊ शकत नाही, अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे.

Published on: Jun 07, 2023 09:19 AM