एकनाथ शिंदे आधीपासूनच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर  नव्हते, राष्ट्रवादीच्या नेत्याचा खळबळजनक दावा

” एकनाथ शिंदे आधीपासूनच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नव्हते”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा खळबळजनक दावा

| Updated on: Jun 22, 2023 | 10:22 AM

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 सहकारी आमदारांसह बंड करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे. "महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधीपासूनच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नव्हते," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

नागपूर : गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 सहकारी आमदारांसह बंड करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे. “महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधीपासूनच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नव्हते,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “याबाबतीत जर कोणाला त्यांचा व्यक्तिगत पुरावा पाहिजे असेल तेव्हा मी तो पुरावा द्यायला तयार आहे. मात्र योग्य वेळ आल्यावर त्याबाबतचा मी पुरावा देणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वीच मी मुख्यमंत्री झालो पाहिजे असंही एकनाथ शिंदे यांच्या मनात होतं.”

Published on: Jun 22, 2023 10:22 AM