“लाडावलेल्या बाळासारखं शरद पवार यांनी सांभाळलं”, जितेंद्र आव्हाड यांची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका
अजित पवार यांनी पक्षातून बंडखोरी केली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे अशा बड्या नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे.
ठाणे: अजित पवार यांनी पक्षातून बंडखोरी केली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे अशा बड्या नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार गटाकडून नाशिकमधील राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “51 आमदाराचा तोंडी पाठिंबा होता. अजित पवार यांचा पक्षांमध्ये दरारा होता, त्यामुळे त्यांना तोंडावर कोणीच नाही म्हणू शकत नव्हता त्यांचा आदर होता. दुसरं तर लाडवलेल्या बाळासारखा सांभाळ प्रफुल पटेल यांचा पवार साहेबांनी केला. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रकार आता होत राहणार. सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेच्या बाबतीत आलेला निकाल यांच्यासाठी फास ठरेल,” असं आव्हाड म्हणाले.