मोबाईल गेमींगद्वारे धर्मांतर; जितेंद्र आव्हाड म्हणतात, उत्तर प्रदेशच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम केलं जातंय!
ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी समोर आणला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंब्रा कनेक्शन देखील समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
ठाणे : ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी समोर आणला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंब्रा कनेक्शन देखील समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “मुंब्रा हे शहर बदनाम होत आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे या मध्ये हिंदू बदनाम होत आहे. मुंब्रा शहराची लाज वेशीवर टांगलेली आहे. मुंब्रा पोलीस ज्या पद्धतीने इतर कारवाई करतात त्या पद्धतीने 400 मुलं धर्मांतर केली आहे, त्यांची नावं आणि पत्ते त्यांनी द्यावे.महाराष्ट्रामध्ये दंगली घडण्याचा प्लान आहे. महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी घालून बदनाम करण्याचा प्लान आहे. उत्तर प्रदेशचा वापर करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्लान असू शकतो. गेमिंगमुळे धर्म परिवर्तन होत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.