Jitendra Awhad | ‘निवडणूक आयोग कधीच बरखास्त होऊ शकत नाही’ – जितेंद्र आव्हाड
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यांनी आज निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना ( Shiv Sena ) नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे उद्धव ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निर्णय मला पटलेला नाही. कधी कधी आपल्या न्यायालयाने दिलेल्या निर्णय सुद्धा पटत नाहीत. त्यामुळे हा सुद्धा निर्णय पटलेला नसून आता त्याबद्दल फारस बोलणार नाही.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘व्हिप काढण्याचा शिंदे गटाचा अधिकार आहे. त्यामुळे ते व्हीप काढणारच. निवडणूक आयोग कधीच बरखास होऊ शकत नाही. ते सर्व संविधाननुसार निर्माण झालेले आहेत.’ उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांसोबत बोलताना निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं होतं.