विजयानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी झळकवले गोडसेंचे पोस्टर; जितेंद्र आव्हाड म्हणतात, उद्या दाऊदचा...

विजयानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी झळकवले गोडसेंचे पोस्टर; जितेंद्र आव्हाड म्हणतात, “उद्या दाऊदचा…”

| Updated on: Jun 27, 2023 | 3:49 PM

एसटी सहकारी बँक निवडणुकीत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच जागांवर विजय मिळालाय. शरद पवार पुरस्कृत पॅनेल आणि गोपीचंद पडळकरांच्या पॅनलचाही सदावर्तेंच्या पॅनलने पराभव केला. विजयानंतर सदावर्तेंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे पोस्टर झळकावले.

मुंबई : एसटी सहकारी बँक निवडणुकीत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच जागांवर विजय मिळालाय. शरद पवार पुरस्कृत पॅनेल आणि गोपीचंद पडळकरांच्या पॅनलचाही सदावर्तेंच्या पॅनलने पराभव केला. विजयानंतर सदावर्तेंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे पोस्टर झळकावले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, “काही लोकांना वैचारिक स्तर नाही. त्या लोकांवर बोलायची गरज नाही. आज हे लोक गोडसेचा फोटो लावत आहेत, उद्या ते दाऊदचा फोटोही लावतील.” राज्यभरातल्या 281 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडली.

 

Published on: Jun 27, 2023 03:49 PM