Special Report | राज ठाकरे जनतेचे मुख्यमंत्री, मनसैनिकांची बॅनरबाजी, जितेंद्र आव्हाड यांची टोलेबाजी!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बुधवारी 55 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मनसे कार्यकर्त्यांसाठी हा एक उत्सवच होता. वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि केक कापून जल्लोष करण्यात आला. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी मनसैनिकांनी बॅनर्स लावले असून त्यावर भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे असा उल्लेख करण्यात आला.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बुधवारी 55 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मनसे कार्यकर्त्यांसाठी हा एक उत्सवच होता. वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि केक कापून जल्लोष करण्यात आला. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी मनसैनिकांनी बॅनर्स लावले असून त्यावर ‘भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे’, असा उल्लेख करण्यात आला. या पोस्टरबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे. “राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता त्यांच्याकडे एकच आमदार आहे. त्यांनी ते 50 पर्यंत न्यावे, नुसत्या नकला कारून होणार नाही”, असं आव्हाड म्हणाले. आव्हाड यांच्या या टीकेवर मनसे नेते गजानन काळे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. गजानन काळे नेमकं काय म्हणाले, यासाठी पा यासंदर्भातील स्पशेल रिपोर्ट…
Published on: Jun 15, 2023 07:43 AM
Latest Videos