लोकसभा निवडणुकीत इंडियाला यश मिळणार? जितेंद्र आव्हाड म्हणाले, फोडाफोडीच्या राजकराणामुळे...

लोकसभा निवडणुकीत इंडियाला यश मिळणार? जितेंद्र आव्हाड म्हणाले, “फोडाफोडीच्या राजकराणामुळे…”

| Updated on: Jul 20, 2023 | 10:02 AM

देशातील सर्व विरोधकांची बंगळुरूमध्ये दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक महत्वाची होती. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 20 जुलै 2023 | देशातील सर्व विरोधकांची बंगळुरूमध्ये दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक महत्वाची होती. या बैठकीला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “दक्षिण भारतातून भाजप आता हद्दपार झाली आहे, त्यामुळे उरलेले फक्त दोनच राज्य आहेत ते म्हणजे गुजरात आणि उत्तरप्रदेश. महाराष्ट्रातही लोकसभेच्या 36 जागा या मविआला मिळतील आणि याचे श्रेय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जाईल. कारण फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपमध्येच अस्वस्थता दिसून येत आहे. “

Published on: Jul 20, 2023 10:02 AM