J. P. Nadda Video : देशातून सर्व पक्ष नष्ट होतील, फक्त भाजपच उरणार : जे.पी. नड्डा
देशातून सर्व पक्ष नष्ट होतील, फक्त भाजपच उरणार आहे. असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे म्हणणे आहे. आपल्या विचारधारेवर चालत राहिल्यास देशातून प्रादेशिक पक्ष संपुष्टात येतील, असे ते म्हणाले.
देशातून सर्व पक्ष नष्ट होतील, फक्त भाजपच उरणार आहे. असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda )यांचे म्हणणे आहे. आपल्या विचारधारेवर चालत राहिल्यास देशातून प्रादेशिक पक्ष संपुष्टात येतील, असे ते म्हणाले. बिहार भाजपच्या 16 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन करण्यासाठी नड्डा पाटण्यात पोहोचले होते. बिहारमधील 7 जिल्ह्यांतील कार्यालयांची पायाभरणीही त्यांनी केली. नड्डा म्हणाले की, भारतीय जनता पक्षाविरुद्ध लढण्यासाठी कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक नाही. आमची खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीशी आहे. कार्यकर्त्यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, काही मिळाले नाही. काही मिळणार नाही. तरीही लोक गुंतलेले आहेत.
Published on: Aug 02, 2022 11:24 AM
Latest Videos