सत्ता संघर्षाच्या निकालापूर्वी राऊत यांचे वक्तव्य; सर्वोच्च न्यायालय संविधानाची- लोकशाहीची हत्या…
सर्वोच्चच न्यायालय संविधान आणि लोकशाहीची हत्या करणार नाही, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. याच बरोबर त्यांनी, आमचा न्यायालयावर विश्वास आहे.
मुंबई : न्यायव्यवस्थेवरील (Judiciary) विश्वास व्यक्त करताना आजचा निर्णयावर देशात लोकशाही आहे की नाही हे समजेल. सर्वोच्चच न्यायालय संविधान आणि लोकशाहीची हत्या करणार नाही, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. याच बरोबर त्यांनी, आमचा न्यायालयावर विश्वास आहे. घटनापीठ जे आहे, सरन्यायाधीश चंद्रचूड (Chief Justice Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी प्रदीर्घ काळ भूमिका ऐकली आहे. आम्ही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. जसा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, तसा ज्यांनी देशाला संविधान आणि घटना दिली त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे, सर्वोच्च न्यायालय संविधानाची- लोकशाहीची हत्या करणार नाही. आजचा फैसल्याने या देशात न्यायालये स्वतंत्र आहे की नाही, आज त्याचा निर्णय होणार असही राऊत म्हणाले