उंच भरारी; शेतात राबणारी शेतमजुर मुलगी होणार डॉक्टर; खुरप्या ऐवजी हातात येणार टेटस्कोप, मात्र…
आधी नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं. त्यासाठी काही जन खासगी शिकवण्या लावतात तर काही स्वत: अभ्यास करतात. त्यातून मग काहींचाच नबंर हा डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगच्या काँलेजमध्ये होतो. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालक्यातील कंधारेवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी असणाऱ्या ज्योती कंधारे हिने ही अशीच उंच भरारी घेतली आहे.
नांदेड : डॉक्टर आणि इंजिनिअर व्हायचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक जन खूप मेहनत घेतात आणि ते यशस्वी होतात. पण हे यश सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी आधी नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं. त्यासाठी काही जन खासगी शिकवण्या लावतात तर काही स्वत: अभ्यास करतात. त्यातून मग काहींचाच नबंर हा डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगच्या काँलेजमध्ये होतो. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालक्यातील कंधारेवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी असणाऱ्या ज्योती कंधारे हिने ही अशीच उंच भरारी घेतली आहे. तिने अथक प्रयत्न करत नीटच्या परीक्षेत 720 पैकी 563 गुण मिळावले आहेत. त्यामुले तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आता पुर्ण होणार आहे. मात्र तिला हे फक्त सरकारी काँलेजमध्येच प्रवेश मिळालं तर शक्य होणार आहे. कारण खासगी काँलेजमधली फि आणि खर्च तिला परवडणारा नाही. तिला मदत करू इच्छिणाऱ्या साठी सोबत तिचे बँक डीटेल्स दिले आहेत. पहा तिची ही उंच भरारीची कहाणी