काँग्रेस आमदाराकडून रावसाहेब दानवेंचं तोंडभरून कौतुक, म्हणाला, “जालन्यात अनेक विकास योजना…”
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं कौतुक करण्यात आलं आहे. जालन्यात अनेक विकास योजना येण्यात दानवे यांचं योगदान असल्याचं गोरंट्याल म्हणाले आहेत.
जालना: काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं कौतुक करण्यात आलं आहे. जालन्यात अनेक विकास योजना येण्यात दानवे यांचं योगदान असल्याचं गोरंट्याल म्हणाले आहेत. जालनामध्ये छत्रपती संभाजी महाराज उद्यानात १५० फुट उंच राष्ट्रीय ध्वज आणि मोती तलाव चौपाटीवर रेल्वे इंजिन बसविण्याचा भुमिपुजन सोहळा दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भाषण करताना कैलास गोरंट्याल यांनी रावसाहेब दानवे यांचं कौतुक केलं आहे. “जालना शहरात जी विकास कामे झाली ती फक्त दानवे यांच्यामुळे झाली आणि यासाठी रावसाहेब दानवे यांचे नाव घेतले पाहिजे”, असं कैलास गोरंट्याल म्हणाले.
Published on: Jun 02, 2023 09:35 AM
Latest Videos

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले

धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
