“संभाजी भिडे तुम्हारे मे बहुत है किडे, एक दिन…”; कैलास गोरंट्याल यांचा हल्लाबोल
संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांना अटक करा अशी मागणी यशोमती ठाकूर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी लावून धरली यानंतर या दोघांनी जीवेमारण्याची धमकी मिळाली. याच पार्श्वभूमीवर कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल काही अपशब्द वापरल्याने काँग्रेस आणि विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने वारंवार केली जात आहे. काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर भिडेंविरोधात आक्रमक होताना दिसले. यानंतर या दोन्ही नेत्यांना धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “संभाजी भिडे यांना अटक झाली पाहिजे. काँग्रेसची ही पूर्वीपासूनची मागणी आहे.संभाजी भिडे तेरे सर मे पागलपण किडे, जल्दी तू जेल मे सडे, हजारो जूते तुम्हा वहा पडे. संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्यांना धमकी दिली आहे पण त्या धमक्यांना आमचे नेते घाबरत नाही.”