कलाकार आपापल्या पद्धतीने जाब विचारतात

कलाकार आपापल्या पद्धतीने जाब विचारतात

| Updated on: Aug 03, 2022 | 9:45 PM

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा चुकीचा अर्थ लावून तेच तेच आणि नको त्या गोष्टी व्हायरल केल्या जातात असंही त्यांनी यावेळी सांगितले. 

राज्यातील सध्याच्या राजकारणाबद्दल महाराष्ट्रातील कलाकार भूमिका घेत नाहीत अशी टीका होत असतानाच अभिनेता कैलास वाघमारे यांनी मात्र टीका करण्यासारखी परिस्थिती आहे का राज्यात असा सवाल उपस्थित केला आहे.  सरकारला जाब विचारताना तो कॅमेऱ्यासमोरच येऊन विचारला पाहिजे असा काही नाही मात्र कवी, लेखक, नाटककार, चित्रपटनिर्माते, चित्रपट कलाकार त्यांच्या त्यांच्या माध्यमातून आपला आवाज आणि आपले सवाल उपस्थित करत असतात असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी टीका केली तर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा चुकीचा अर्थ लावून तेच तेच आणि नको त्या गोष्टी व्हायरल केल्या जातात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Published on: Aug 03, 2022 09:45 PM