“अमोल मिटकरी यांच्यात उद्याचा संजय राऊत दिसतोय,” काँग्रेस प्रवक्त्याचं टीकास्त्र
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी टीका केली आहे. अंबादास दानवे यांच्याकडे असलेले विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद एकनाथ खडसे यांना द्यावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. यावर काकासाहेब कुलकर्णी यांनी टीका केली आहे.
सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी टीका केली आहे. अंबादास दानवे यांच्याकडे असलेले विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद एकनाथ खडसे यांना द्यावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. यावर काकासाहेब कुलकर्णी म्हणाले की, “विरोधीपक्ष नेता कोण असेल याचा निर्णय संख्याबळावर होतं असतं. विधानपरिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे नऊ नऊ जागा होत्या, मनीषा कायंदे शिंदे गटात गेल्याने त्यांच्या जागा कमी होईल. महाविकास आघाडीतील काही नेत्यांना विनंती आहे विरोधी पक्ष नेता कोण होईल याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, त्यामुळे आता लुडबुड करण्यात मजा नाही. अमोल मिटकरी यांनी आता कुठंतरी थांबलं पाहिजे त्यांच्यातला उद्याचा संजय राऊत मला आज दिसतोय. मिटकरी यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी थांबलं तर ते महाराष्ट्रात नेते म्हणून परिचत होतील अन्यथा त्यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही.”