Nashik मधील साधू महंतांचा राज ठाकरेंना जाहीर पाठींबा
आपण धर्मजागरणाचं कर्तव्य बजावत असल्याचे कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केले आहे. जो हिंदू हितकी बात करे, उसी को हम मतदान करे, अशीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जे सत्तेत आहेत, त्यांनी हिंदू (Hindutva) हिताची बाजू घेतली तरच त्यांना पाठिंबा राहिल, असेही कालीचरण महाराजांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक : राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकटेच मर्द आहेत, बाकी सगळे नामर्द आहेत, अशी टीका कालीचरण महाराजांनी (Kalicharan Maharaj) केली आहे. आमचा पाठिंबा राज ठाकरेंना असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्याविरोधात कुणी कितीही बोलत असले तरी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचेही कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केले आहे. आपण धर्मजागरणाचं कर्तव्य बजावत असल्याचे कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केले आहे. जो हिंदू हितकी बात करे, उसी को हम मतदान करे, अशीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जे सत्तेत आहेत, त्यांनी हिंदूत्व (Hindutva) हिताची बाजू घेतली तरच त्यांना पाठिंबा राहिल, असेही कालीचरण महाराजांनी स्पष्ट केले आहे. तर नाशिक येथील महंतांनी देखील राज ठाकरे यांनी आयोध्याला श्रीराम यांच्या दर्शनाला जावं. त्यांना आमचा पाठिंबा असल्याचे नाशिक येथील महंतांनी म्हटले आहे.