Kalicharan Maharaj : वादग्रस वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजचे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबाबत खूप मोठं वक्तव्य

Kalicharan Maharaj : वादग्रस वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजचे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबाबत खूप मोठं वक्तव्य

| Updated on: Jul 28, 2022 | 9:59 PM

उद्धव ठाकरे यांना आता सल्ला देऊन काय फायदा, सल्ला देऊन आता काही उपयोग नाही असे कालीचरण म्हणाले.  शिंदे सरकार चांगलं काम करत आहे.

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजने(Kalicharan Maharaj) उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) आणि शिवसेनेबाबत खूप मोठं वक्तव्य केले आहे.  शिंदे सरकारला माझा आशीर्वाद आहे. जे हिंदूत्ववादी सरकार आहे त्याला माझा आशीर्वाद, पाठींबा आहे. उद्धव ठाकरे यांना आता सल्ला देऊन काय फायदा, सल्ला देऊन आता काही उपयोग नाही असे कालीचरण म्हणाले.  शिंदे सरकार चांगलं काम करत आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले,उस्मानाबादचे धाराशिव केले, खूप आनंद झाला, हिंदूंच्या अस्मितेचा विजय होत आहे, शिंदे सारखे राजा असणं गरजेचं आहे, शिंदे सरकार कायम रहावं, असे सरकार प्रत्येक प्रांतात असायला हवे. शिंदे सरकार आलं मला आनंद आहे, जे जे हिंदुत्ववादी सरकार आहे त्याला आमचा पाठींबा आहे. शिवसेना कुणाचीही असो शिवाजी महाराज हिंदूंचे आहेत असेही कालीचरण म्हणाले.