Kalyan : मरणानंतर सरणावरही अंधार! चक्क गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की

Kalyan : मरणानंतर सरणावरही अंधार! चक्क गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की

| Updated on: Jul 23, 2022 | 7:44 AM

कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

कल्याण (Kalyan News) येथील विठ्ठलवाडी (Vithalwadi) परिसरातील स्मशानभूमीत अंत्यविधीच्या ठिकाणी दिवेच नाही. त्यामुळे याठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरीकांना चक्क गाडीच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ ओढावली आहे. दरम्यान, या स्मशानभूमी दिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नातेवाईकां कडून करण्यात येत आहे. कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. विठ्ठलवाडी परिसरात स्मशानभूमीत संपूर्णपणे अंधार आहे. परिणामी मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शुक्रवारी सायंकाळी कल्याण सुभाष नगर परिसरातील एक व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबीयांना याचाच मनस्ताप सहन करावा लागला. या कुटुंबातील नागरिकांनी गाडीच्या बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत असल्याने कल्याण महापालिकेविरोधात (KDMC News) संताप व्यक्त केला जातोय.