“मुख्यमंत्री शिंदे यांच्या आमदारांची गाडी परत अजित पवार यांच्या टोलनाक्यावर येऊन थांबली”, काँग्रेसचा टोला
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत येताच त्यांना आणि त्यांच्या आमदारांना लगेच खातेवाटप करण्यात आले, मात्र एक वर्ष उलटूनही शिंदेंच्या आमदारांना खातेवाटप करण्यात आलेले नाही, यामुळे शिंदे गट कुठेतरी नाराज असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेश कॅांग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
अकोला : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे. अजित पवार सत्तेत येताच त्यांना आणि त्यांच्या आमदारांना लगेच खातेवाटप करण्यात आले, मात्र एक वर्ष उलटूनही शिंदेंच्या आमदारांना खातेवाटप करण्यात आलेले नाही, यामुळे शिंदे गट कुठेतरी नाराज असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेश कॅांग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “अजित पवार आर्थिक नाकेबंदी करतात असे कारण देत सुरत मार्गे गुवाहाटीत जाऊन सत्तांतर करणाऱ्या शिंदेच्या आमदारांची गाडी परत अजित पवारांच्या टोलनाक्यावर येऊन थांबली आहे. तर
अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची सेना आणि भाजप यांचं राजकारण महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. राज्यातील लोकांनी आगामी काळात काँग्रेसच्या पाठीशी राहावे काँग्रेसच महाराष्ट्राला अपेक्षित सुशासन देऊ शकते.”