राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील मुद्दे पाहा...

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील मुद्दे पाहा…

| Updated on: Feb 21, 2023 | 4:10 PM

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात उद्धव ठाकरे यांची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी महत्वाचे मुद्दे मांडले. पाहा...

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात उद्धव ठाकरे यांची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी महत्वाचे मुद्दे मांडले. “गुवाहाटीत बसून तुम्ही महाराष्ट्रातील निर्णय घेऊ शकत नाही. शिंदेंनी दुसऱ्या राज्यांची मदत घेतली. अविश्वास प्रस्तावाचा मेल अधिकृत ई-मेलवरून नव्हता. बहुमत न पाहता राज्यपालांनी पहाटेचा शपथविधी कसा उरकला? 12 आमदारांचा प्रश्न प्रलंबित ठेवणं हे राज्यपालांचं राजकारण होते. शिंदेंवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना राज्यापालांनी त्यांना शपथ घेऊ दिली. नार्वेकरांना बहुमतापेक्षा एक मत कमी पडलं. राज्यपालांचा हेतू माहिती असल्यानं उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

Published on: Feb 21, 2023 04:08 PM