धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्याला धमकी देणाऱ्याला जामीन?

धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्याला धमकी देणाऱ्याला जामीन?

| Updated on: Aug 01, 2023 | 7:36 AM

तर त्यामुळे पावसाळी अधिवेशनात देखील काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करत सरकारला घेरण्यात आलं होतं. तर याचप्रश्नावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत महात्मा गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यावरून संभाजी भिडे यांना अटक करा अशी मागणी केली होती.

सातारा, 01 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्याचे पडसाद राज्यातभर उमटले होते. तर त्यामुळे पावसाळी अधिवेशनात देखील काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करत सरकारला घेरण्यात आलं होतं. तर याचप्रश्नावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेत महात्मा गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यावरून संभाजी भिडे यांना अटक करा अशी मागणी केली होती. तर यादरम्यान राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसचे नेते आंदोलन करत आहेत. तर अमरावतीत भिडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अटक झालेली नाही. याचदरम्यान विधानसभेत महात्मा गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यावरून भिडे यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देण्यात आली होती. त्यांना मेल आणि फोनवरून धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी कराड पोलिसांनी अंकुश सवारातेला अटक करण्यात आली होती. तर चव्हाण यांच्या सुरक्षीततेत वाढ करण्यात आली होती. यानंतर आता सवारातेला कराड न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याचे समोर आले आहे. Maharashtra Politics

Published on: Aug 01, 2023 07:36 AM