Karjat Bazar Samiti Election : रोहित पवार कि राम शिंदे कोण राखणार गड? कर्जत बाजार समितीत आज होणार चित्र स्पष्ट
मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत दोघांनाही समसमान नऊ जागा मिळाल्या होत्या. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. यामुळे सेवा सहकारी संस्थेच्या सात जागा व महिला मतदार संघाच्या दोन जागा अशा नऊ जागांसाठी ही फेर मतमोजणी होणार आहे.
कर्जत : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या मधील टोकाचा संघर्ष समोर आणणारी निवडणूक झाली आहे. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत दोघांनाही समसमान नऊ जागा मिळाल्या होत्या. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. यामुळे सेवा सहकारी संस्थेच्या सात जागा व महिला मतदार संघाच्या दोन जागा अशा नऊ जागांसाठी ही फेर मतमोजणी होणार आहे. ही आज सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये होणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण सात जागांसाठी 17 उमेदवार असून महिला मतदारसंघाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार आहेत. या फेर मतमोजणीमध्ये 21 उमेदवारांचे भवितव्य पुन्हा एकदा टांगणीला लागले आहे. या फेरमतमोजणीत काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तर मतदार कोणाला कौल देणार? बहुचर्चीत बाजार समिती कोण राखणार याकडेही अनेकांचे लक्ष लागलं आहे.