कुणाचा मुलगा? कोणाचा पाळणा? मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी नेत्याने चढवला जोरदार हल्लाबोल

कुणाचा मुलगा? कोणाचा पाळणा? मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी नेत्याने चढवला जोरदार हल्लाबोल

| Updated on: May 15, 2023 | 8:07 AM

निकालानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाने शिंदे यांच्यासह भाजपवर निशाना साधला होता. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीका केली होती.

मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात महाराष्ट्रातून भाजपची फौज तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखिल भाजपकडून मैदानात उतरले होते. त्यांनी रोड शो आणि सभा घेत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यावरून त्यांच्यावर राज्यातील विरोधकांनी जोरदार हल्लाचढवला होता. तर निकालानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाने शिंदे यांच्यासह भाजपवर निशाना साधला होता. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी कोणाला मुलगा आणि कोण बासरं घालतय तर कुठ पाळणा हालवला जातोय अशी टीका केली होती. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी कर्नाटकाच्या निकालावरून शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. पवार यांनी म्हटले आहे की, बदल हा लोकं करत असतात. त्यामुळे आता तुम्ही शब्दांचे खेळ करू नका, तसेच मुलगा कुठे बारसं कुठे. त्यामुळे तुम्हीदेखील पाळणा हलवायला गेलेला होतात. पण तुमचा पाळणा हलला नाही, त्यामुळे लोकांना आता गंडवू नका असला टोलाही रोहित पवार यांनी शिंदे यांना लगावला आहे.

Published on: May 15, 2023 08:07 AM