Karnataka Assembly Election Result : काँग्रेसने घेतली ‘ऑपरेशन कमळ’ची धास्ती! हालचालींना वेग, सर्व आमदारांना बोलावलं बंगळूरला!
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप 73 जागा, काँग्रेस 105 जेडीएस 22 आणि इतर 4 जागांवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्तेकडे वाटचाल होताना दिसत आहे.
बंगळुरु : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे आज स्पष्ट होत आहे. आज कर्नाटकचा निकाल येत असून भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. एक्झिट पोल अंदाजानुसार कर्नाटकमध्ये कर्नाटक काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप 73 जागा, काँग्रेस 105 जेडीएस 22 आणि इतर 4 जागांवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्तेकडे वाटचाल होताना दिसत आहे. यादरम्यान भाजपकडून ऑपरेशन लोटस केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनेही हालचाली करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना रोखण्यासाठी खास प्लॅन तयार करत त्यांना बंगळुरुमध्ये बोलावलं आहे.