मोदी यांच्यावर टीका करताय, येत्या 10 तारखेला कळेलच; मुख्यमंत्री शिंदे यांचा कोणाला इशारा
भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची मोठी फळी कर्नाटकात दाखल झाली आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचा प्रचार करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकात सध्या भगव वातावरण दिसत आहे असल्याचे सांगत काँग्रेसवर टीका केली.
मुंबई : कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे. या राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची मोठी फळी कर्नाटकात दाखल झाली आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचा प्रचार करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकात सध्या भगव वातावरण दिसत आहे असल्याचे सांगत काँग्रेसवर टीका केली. तसेच इशारा दिला आहे. त्यांनी काँग्रेस नेते अतिशय मर्यादा सोडून, पातळी सोडून प्रधानमंत्री मोदींवर टीका कतरतात हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तर जेव्हा जेव्हा काँग्रेसने मोदीवर टीका केली आहे. त्यावेळी त्यांचा मतदारांनी बदला घेतला, मतदानाद्वारे बदला घेतला. कधीकाळी त्यांची संख्या ही 400 होती ती आता 40 झाली आहे. आताही येणाऱ्या निकालात हेच दिसेल असे शिंदे म्हणाले.
Published on: May 08, 2023 10:18 AM
Latest Videos