कर्नाटक निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांची एन्ट्री, शेवटच्या दिवशी निपाणीत काय भूमिका घेणार?
तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यामुळे होणाऱ्या सभा थांबल्या होत्या. याच्याआधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. फौजीया खान, अमोल मिटकरी, हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार, रोहित पाटील आदींच्या सभा पार पडल्या आहेत.
मुंबई : कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे. या राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची मोठी फळी कर्नाटकात दाखल झाली आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचा प्रचार करत आहेत. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारासाठी सभा घेतली. काँग्रेसच्या नेत्यांनी ही कर्नाटकचा दौरा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यामुळे होणाऱ्या सभा थांबल्या होत्या. याच्याआधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. फौजीया खान, अमोल मिटकरी, हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार, रोहित पाटील आदींच्या सभा पार पडल्या आहेत. आता स्वत: पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रचाराच्या मैदानात उतरत आहेत. पवार यांची सोमवारी निपाणीत सभा होणार आहे. ते राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीमध्ये जाहीर सभेत राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? अशी टीका केली. त्यामुळेच पवार हे निपाणीत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.