राऊत यांच्या शिंदे यांच्यावरील घणाघाती टीकेला शिवसेना नेता उत्तरला; म्हणाला, स्वप्नात देखील खोके दिसत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करताना, त्यांनी सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटलं आहे.
मुंबई : कर्नाटकमधील विधानसभेचं मतदान आज पार पडत आहे. मात्र पार पडलेल्या प्रचारात राज्यातील नेतेच आमने- सामने आले होते. कर्नाटक प्रचारावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) निशाणा साधला. तसेच शिंदे सरकारचा उल्लेख मिंधे सरकार असा उल्लेख करत महाराष्ट्रातील जनता शिंदे-फडणवीसांना माफ करणार नाही असं म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करताना, त्यांनी सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Integration Committee) उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटलं आहे. तर स्वतःला शिवसेना म्हवणून घेणारे मुख्यमंत्री साहेबांनी मंगलोर मार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केल्याचा आरोप शिंदे यांच्यावर केला. त्यावरून आता शिंदे गट आक्रमक झाला असून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला आहे. त्यांनी राऊत यांना, दहा महिन्यात खोकल्याशिवाय काही दिसत नाही. यांचे सर्व खोके एकनाथ शिंदे यांनी बंद केले आहेत. त्यामुळे यांना स्वप्नात देखील खोके दिसत आहेत. जे खोके घेत होते जे महानगरपालिकेमध्ये बोके ते बंद झाले आहेत. त्यामुळे त्याचा सर्व चरितार्थ थांबल्यामुळे चिडचिड होत आहे. या नैराशीतून सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद होत आहे