बोल बजरंगबली! तोड... भाजप; कर्नाटकी जनतेनं भाजपला हटवलं, काँग्रेसला थेट सत्तेत...

बोल बजरंगबली! तोड… भाजप; कर्नाटकी जनतेनं भाजपला हटवलं, काँग्रेसला थेट सत्तेत…

| Updated on: May 14, 2023 | 7:37 AM

काँग्रेसने बहुमतासह विजय मिळवला आणि भाजपला जोरदार झटका दिला. त्यामुळे विजय कर्नाटकचा असला तरी काँग्रेस देशभर जल्लोष साजरा करत आहे. याचं कारणं काँग्रेसचा मोठा विजय.

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल काल लागला. यावेळी कर्नाटकी जनतेनं त्यांची तिच पंरपरा राखत सत्ता बदल केली अन् सलग टर्म भाजप न देता काँग्रेसच्या गळ्यात विजयाची माळ टाकली. कर्नाटक विधानसभेची निवडणूक बजरंग बलीच्या नावाच्या भोवती मात्र निकालामध्ये बजरंगबलीचा आशीर्वाद हा काँग्रेसला मिळाला. काँग्रेसने बहुमतासह विजय मिळवला आणि भाजपला जोरदार झटका दिला. त्यामुळे विजय कर्नाटकचा असला तरी काँग्रेस देशभर जल्लोष साजरा करत आहे. याचं कारणं काँग्रेसचा मोठा विजय. भाजपला सत्तेतून बाहेर खेचत काँग्रेसने सत्ता काबीज केली. काँग्रेसला 136 जागा मिळाल्यास त्याच 2018 78 होत्या. ज्या यावेळी 58 जागांनी वाढल्या. तर भाजपला 2018 104 जागा काबीज करत सत्तेत आली होती. त्यांना आता फक्त 65 जागा मिळाल्या आहेत. त्यांना 39 जागांवर फटका बसला आहे. तर या निवडणुकीत सगळ्यात मोठा फटका हा जीडीएसला बसला असून 2018 मध्ये किंगमेकर होऊन मुख्यमंत्री झालेल्या पक्षाला फक्त 19 जागा मिळाल्या आहेत. त्यांना 2018 मध्ये 37 जागा मिळाल्या होत्या. यानिकालानंतर आता अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या विजयावर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकामधील निवडणूक आम्ही लोकांच्या मुद्यावर लढलो. जनतेच्या प्रश्नाला महत्व दिले. या ठिकाणी जनतेने भांडवलशाहीचा पराभव केल्याचंही राहुल गांधी म्हणाले. तसेच मला सगळ्यात जास्त ही गोष्ट आवडली की आम्ही द्वेषाने, चुकीच्या शब्दांनी ही लढाई नाही लढली. आम्ही प्रेमाने ही लढाई लढलो. कर्नाटकच्या जनतेनं आम्हाला हे दाखवलं की प्रेम या देशाला हवंसं वाटतंय. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं उघडली गेली आहेत. हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव स्वीकारला. त्यांनी पंतप्रधान आणि भाजप कार्यकर्त्यांच्या सर्व प्रयत्नांनंतरही आम्ही लक्ष्य गाठू शकलो नाही. पूर्ण निकाल आल्यानंतर, आम्ही सखोल विचारमंथन करू असं म्हटलं. बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 14, 2023 07:37 AM