काँग्रेसच्या कर्नाटक विजयावर शिवसेना मंत्र्याचं वक्तव्य, म्हणाला, ते तर…
तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआवर आणि ठाकरे गटावर निशाना साधत बेगानी शादी में अब्दुल्ला बेगाना म्हणत टीका केली होती.
बुलढाणा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election Results 2023) भाजपचा दणदणीत पराभव झाला. तर काँग्रेसने विजयश्री खेचून आणली. या पराभवामुळे भाजपवर देशभरातून टीका होत आहे. तर, भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते अत्यंत माफक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआवर आणि ठाकरे गटावर निशाना साधत बेगानी शादी में अब्दुल्ला बेगाना म्हणत टीका केली होती. राज्यात भाजप आणि शिंदे गट हा टीकांना उत्तर देत असताना मात्र शिंदे यांच्या मंत्रीमंडळातले पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र काँग्रेसचा हा विजय मान्य करावाचं लागेल असं म्हटलं आहे. तर विजय हा विजयच असतो. लोकशाहीत प्रजा राजा आहे. त्यांचा कौल महत्त्वाचा आहे. कर्नाटकमध्ये प्रजेने त्यांचा राजा निवडला असेही ते म्हणालेत.
Published on: May 14, 2023 08:42 AM
Latest Videos