शिवसेना नेत्याच्या रडारवर पुन्हा उद्धव ठाकरे अन् राऊत; म्हणाला, ”त्यांना पाहावत नाही, म्हणून ते…”
या शपथविधीसाठी महाविकास आघाडीचे नेते देखील जाणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांपैकी या शपथविधीसाठी उपस्थित असतील असे सांगण्यात येत होते.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुका जिंकत काँग्रेसने भाजपला हारवलं. आज नवनियुक्त मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा (20 मे रोजी) बेंगळुरू येथे शपथ होणार आहे. या शपथविधीसाठी महाविकास आघाडीचे नेते देखील जाणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांपैकी या शपथविधीसाठी उपस्थित असतील असे सांगण्यात येत होते. मात्र उद्धव ठाकरे हे गेले नाहीत. त्यावरून ही आता उलटसुलट चर्चा होत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यापासून थोडसं दुःखात आहेत. तर कोणताही मुख्यमंत्री होत असताना त्यांना ते सहन होत नाही. म्हणून ते गेले नाहीत. तर सध्या सिलव्हर ओकवर काका मला वाचवा हा प्रयोग सुरू आहे. तर संजय राऊत आणि ठाकरे हे सिलव्हर ओकवर कटोरे घेऊन जातात अशीही टीका संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.