Maharashtra Politics : मविआतील कलह संपला? लोकसभा जागा वाटपाचा फॉमुर्लाही ठरला? पवार यांच्या बैठकीत नेमकं काय झालं?

Maharashtra Politics : मविआतील कलह संपला? लोकसभा जागा वाटपाचा फॉमुर्लाही ठरला? पवार यांच्या बैठकीत नेमकं काय झालं?

| Updated on: May 15, 2023 | 7:19 AM

त्याचपार्श्वभूमिवर शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत मविआची महत्त्वाची बैठक पार पडली आणि पुन्हा एकदा भाजपविरोधात हुंकार भरण्यात आला आहे. यावेळी उद्धव ठाकरेही या बैठकीसाठी सिल्व्हर ओकवर उपस्थित होते.

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या एक हाती विजयाने राज्यातील मविआचा विश्वास दुनावल्याचं पहायला मिळत आहे. त्याचपार्श्वभूमिवर शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत मविआची महत्त्वाची बैठक पार पडली आणि पुन्हा एकदा भाजपविरोधात हुंकार भरण्यात आला आहे. यावेळी उद्धव ठाकरेही या बैठकीसाठी सिल्व्हर ओकवर उपस्थित होते. आगामी प्रत्येक निवडणूक मविआ एकत्रच लढेल, टप्प्याटप्प्यानं जागावाटपाची चर्चा होईल असं या बैठकीत एकमतानं झाल्याचं समोर आलं आहे. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मविआ एकत्रच लढेल असा निर्णय झालाय. या बैठकीनंतर जयंत पाटील, नाना पटोले आणि संजय राऊत यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत मविआने केलेली चर्चा काय होती आणि पुढचा कार्यक्रम काय असेल हे सांगितलं. मात्र खरचं अस झालं का? कारण मधल्या काळात राष्ट्रवादी-ठाकरे गट, ठाकरे गट-काँग्रेस, काँग्रेस-राष्ट्रवादी असा कलगितूरा रंगला होता. ज्यामुळे मविआच्या वज्रमूठीलाच तडे गेल्याचे बोलले जात होते. त्यामुळे नक्की मविआ एकत्र आहे का? त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 15, 2023 07:19 AM