Karnataka Election : सत्ताधारी कोण होणार? आणि विरोधी बाकाचा धनी कोण? आज मतदानात ठरणार; मतदानाला सुरूवात
आज सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तर एकाच टप्प्यात हे मतदान पार पडेल.
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) आज मतदान होणार आहे. मतदार कर्नाटकमध्ये सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देणार हे आज ठरवणार आहेत. आज (10 मे) सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तर एकाच टप्प्यात हे मतदान पार पडेल. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून 224 जागांसाठी मतदान होत आहे. ज्यामध्ये आज अनेक दिग्गजांचे भवितव्यही ईव्हीएममध्ये सील होणार आहे. राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. तर बेळगावमध्ये 18 जागांसाठी 187 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांचेही भवितव्य ठरवणार आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश येतं का? हे निकालानंतर कळणार आहे.
Published on: May 10, 2023 08:53 AM
Latest Videos